मोतीबिंदू ऑपरेशनच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? | Cataract Surgery Day: Do’s and Don’ts
#मतबद #ऑपरशनचय #दवश #कय #करव #आण #कय #कर #नय #Cataract #Surgery #Day #Dos #Donts
या व्हिडिओमध्ये, डॉ. सौरभ पटवर्धन मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या दिवशी रुग्णांनी काय करावे आणि काय टाळावे याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. ऑपरेशनला येताना कोणत्या गोष्टींची अपेक्षा ठेवावी आणि हॉस्पिटलमध्ये कोणत्या प्रक्रिया पार पाडल्या जातात, याची माहिती ते सोप्या भाषेत समजावून सांगतात.
व्हिडिओमध्ये खालील विषयांवर मार्गदर्शन दिलेले आहे:
• ऑपरेशनच्या आधीची तयारी:
• चेकअप आणि टोकनची माहिती
• वेळेवर हॉस्पिटलमध्ये कधी यावे?
• ऑपरेशनच्या आधीचे ड्रॉप्स (Eye Drops) कधी आणि कसे टाकावे?
• सुरु असलेली औषधे (Medications) कधी घ्यावी?
• हॉस्पिटलमधील प्रक्रिया:
• कॅश काउंटरवर पेमेंट आणि संमतीपत्र (Consent form)
• वॉर्डमध्ये नर्स आणि असिस्टंटद्वारे नोंदणी
• डोळ्याच्या बुबुळाला मोठे करणारे ड्रॉप्स (Pupil dilating drops)
• तपासणी आणि डॉक्टरांशी चर्चा
• ऑपरेशनच्या वेळेस काय काळजी घ्यावी:
• ऑपरेशनच्या वेळेस डोळे स्थिर ठेवा
• खोकला किंवा शिंक आल्यास काय करावे?
• ऑपरेशननंतर काय अपेक्षित आहे:
• डोळ्यांची स्वच्छता आणि औषधोपचार
• धुसर दृष्टी (Blurred vision) आणि दृष्टी सुधारणे
• डिस्चार्ज पेपर आणि फॉलोअपची माहिती
डॉ. सौरभ पटवर्धन यांच्याकडून मोतीबिंदू ऑपरेशनच्या दिवसासाठी उपयुक्त टिप्स आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा!
In this video, Dr. Sourabh Patwardhan is guiding patients on what to do and what to avoid on the day of cataract surgery. He explains in simple terms what to expect when coming for the operation and what procedures are performed in the hospital.
The video provides guidance on the following topics:
• Pre-operative preparation:
• Information about check-up and token
• When to arrive at the hospital on time?
• When and how to apply pre-operative eye drops?
• When to take ongoing medications?
• Hospital procedures:
• Payment and consent form at the cash counter
• Registration by nurses and assistants in the ward
• Pupil dilating drops
• Examination and discussion with the doctor
• What precautions to take during the operation:
• Keep the eyes still
• What to do if you cough or sneeze?
• What to expect after the operation:
• Eye cleaning and medication
• Blurred vision and vision improvement
• Discharge paper and follow-up information
Be sure to watch this video for useful tips and guidance for the day of cataract surgery from Dr. Sourabh Patwardhan!
#Cataract #CataractSurgery #NandadeepEyeHospital #EyeHealth #DrSourabhPatwardhan #Marathi #Pune #India #मोतीबिंदू #डोळे #आरोग्य #HealthTips #CataractSurgeryTips #PreparingForSurgery #DayOfSurgery
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.
Transcript :-
नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला मोतीबिंदूच्या ऑपरेशनला तुम्ही ज्यावेळी येता त्यावेळी कुठल्या गोष्टी अपेक्षित असतात याचा थोडक्यात माहिती देणार आहे जेणेकरून ज्यावेळी तुम्ही ऑपरेशनला याल त्यावेळी तुम्हाला काय काय गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित आहेत आणि काय गोष्टी होणार आहेत याची तुम्हाला कल्पना असेल सर्वात पहिल्यांदा तुमचा ऑलरेडी ऑपरेशनच्या आधी चेकअप झालेला असेल ओपीडी मध्ये आणि तुम्हाला एक ऑपरेशन डेट टोकन तुम्हाला दिलेला असेल ज्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचं पॅकेज सिलेक्ट केले आणि तुम्हाला कुठल्या दिवशी यायचं याची माहिती असेल अर्थात तुम्हाला कुठल्या वेळी यायचं आहे याच्या विषयी एक दिवस आधी आमचे जे समुपदेशक आहेत ते तुम्हाला कॉल करून सांगतील आणि त्यावेळी तुम्हाला यायचं असेल ऑपरेशनच्या आधीची काही तुम्हाला औषध ड्रॉप्स दिलेली असतील तर ती ऑपरेशन पूर्वी हे गरजेचे आहेच पण येताना ती जरूर तुम्ही घेऊन या जर काही कारणाने ते आधी जमलं नसेल तरी ऑपरेशनच्या दिवशी ती घातली तरी चालू शकतात दुसरी गोष्ट तुम्हाला ऑपरेशनच्या आधीपासून काही शारीरिक औषध चालू असतील तर ती चालू ठेवणे हे गरजेचे आहेच पण आणि तुम्ही ज्यावेळी ऑपरेशनला येता त्यावेळी ते बरोबर घेऊन सुद्धा या जर काही विशिष्ट औषध असं रक्त पातळ करण्याच्या गोळ्या तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला थांबवायला सांगितल्या असतील तर त्याप्रमाणे त्या थांबवा अर्थात ही सगळी औषध ऑपरेशनच्या दिवशी तुम्ही बरोबर ठेवा याचं कारण असं आहे की ऑपरेशनच्या दिवशी काही अधिक औषधांची तुम्हाला गरज लागली तर आम्हाला त्याची माहिती आधीपासूनच असेल अप्रेनला ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी तुम्ही टोकन घेऊन पहिल्यांदा कॅशियर कडे जाता जिथे तुम्हाला दोन प्रोसेसेस कम्प्लीट करायच्या असतात एक तुमचा जो पेमेंटचा भाग असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅश किंवा कॅशलेस किंवा यूपीआय द्वारे पेमेंट करायचं असतं याची पूर्तता तुम्ही तिथे करून घेता त्याचप्रमाणे तुम्हाला संमतीपत्र किंवा कन्सेंट याच्यावर सही करायची असते हा कन्सेंटचा फॉर्म तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही तो पूर्ण वाचून आणि त्यानंतर त्याच्यावर सही करून आमच्या कॅशियर कडे तो परत द्या ही कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तुम्हाला आमच्या वॉर्ड मध्ये किंवा डेक केअर एरियामध्ये आमचे नर्सेस किंवा असिस्टंट हे ऍडमिट करून घेतात तुमची ऍडमिशनची पहिली प्रोसेस झाल्यानंतर तुमची सर्व माहिती आमच्या इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड मध्ये चेक केल्यानंतर ते तुम्हाला औषधाचे ड्रॉप बाहुली मोठी होण्यासाठी घालण्यास चालू करतात ज्यावेळी तुम्ही ऍडमिट होता त्यावेळी स्वतःहून सुद्धा तुम्ही जर तुम्हाला कुठल्या पर्टिक्युलर औषधांची ऍलर्जी असेल तर त्याची पूर्ण कल्पना आमच्या असिस्टंट द्या जेणेकरून ऑपरेशनच्या आधी किंवा नंतर दिलेल्या औषधांमध्ये जर काही बदल करायचा असेल तर त्याविषयी ते डॉक्टरांना विचारून बदल करून घेऊ शकतात डोळ्यामध्ये ज्यावेळी आम्ही बाहुली मोठी करायचा औषध घालायला लागतो त्यानंतर साधारणतः 30 ते 40 मिनिटांमध्ये ही बाहुली मोठी होते काही रुग्णांना याच्यापेक्षा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो डोळ्यात ड्रॉप्स घालायला चालू केल्यानंतर आपल्याला डोळे बंद करून ठेवणं हे जास्त सोयीस्कर असतं त्यामुळे ज्या डोळ्यात घातलेल्या ड्रॉप्सचा इफेक्ट हा लवकर येतो ऑपरेशनच्या दिवशी तुम्हाला डोळ्यामध्ये काही बदल जाणवत असेल जसं डोळा त्याच दिवशी जास्त लाल झाला आहे किंवा डोळ्याला दिसण्याचे प्रमाण या एक दोन दिवसातच जास्त कमी झालेला आहे किंवा इतर डोळ्याला दुखणं किंवा इतर काही त्रास तुम्हाला आत्ता वाटत असेल जो पूर्वी तपासणीच्या वेळी नव्हता तर त्याची कल्पना सुद्धा तुम्ही आमच्या असिस्टंट द्या त्यामुळे जर गरज लागली तर आम्ही ऑपरेशनच्या दिवशी तुमची पुन्हा तपासणी करून घेऊ शकतो ऑपरेशनला ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी सर्वप्रथम अतिशय निर्धास्त रहा कारण हे ऑपरेशन हे अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचं होणारच आहे यासाठी आमची पूर्ण टीम सतत कार्यरत राहते आणि इतक्या वर्षाचा अनुभव असल्यामुळे हे ऑपरेशन तुमचं नक्कीच सुरळीत पार पडेल याविषयी तुम्ही कुठलीही चिंता मनात बाळगू नका आता ज्यावेळी तुमचा औषध घालून बाहुली मोठी होते त्यानंतर तुमच्या क्रमानुसार तुम्हाला ऑपरेशन साठी पुढे पाठवलं जातं आमच्या इथे जी मोतीबिंदूचे ऑपरेशन होतात ते सर्वच तज्ञ डॉक्टर करतात आणि याच्यामध्ये बऱ्याचदा इंजेक्शन देण्याची किंवा पट्टी लावण्याची गरज लागत नाही काही क्वचित केसेस मध्ये ज्यामध्ये थोडेसे कॉम्प्लेक्स केस असतील किंवा काही वेळा जर तुम्हाला कुठलाही त्रास वाटत असेल ऑपरेशनच्या दरम्यान तर आम्ही तो डोळा बधीर करू शकतो आणि त्यासाठी पट्टी लावण्याची गरज असते हे एक टक्के रुग्णांना गरजेचं असू शकतं पण अजिबात घाबरू नका कारण कुठलीही प्रोसिजर झाली तरी तुम्हाला कुठलाही दुखणार नाही आणि तुम्हाला कुठलाही त्रास ऑपरेशनच्या दरम्यान होणार नाही याची आम्ही नक्कीच खबरदारी घेऊ ऑपरेशनला ज्यावेळी तुम्ही वेटिंगला थांबलेले असता त्यावेळी आम्ही काही औषधाच्या गोळ्या सुद्धा तुम्ही ऑपरेशनच्या आधी देतो जेणेकरून तुमचा ताण किंवा मानसिक तणाव जो आहे तो कमी होण्यास तुम्हाला मदत होते तसेच तुम्हाला खोकला येऊ नये या साठी सुद्धा काही वेळा आम्ही प्यायचं औषध तुम्हाला देऊ शकतो ऑपरेशन थिएटर पर्यंत पोहोचण्यासाठी जर तुम्हाला व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरची गरज असेल तर त्याची तुम्ही जरूर आमच्या सहाय्यकांना कल्पना द्या जेणेकरून आम्हाला ती अरेंज करता येईल तुमच्यासाठी त्यामुळे तुम्हाला जर पाठीला त्रास असेल चालायला त्रास असेल तर मुळीच तुम्ही चालत जाऊ नका आम्ही त्याच्याविषयी व्हीलचेअरची तुमच्यासाठी व्यवस्था करू ऑपरेशन टेबलवर झोपल्यानंतर काही रुग्णांना झोपताना त्रास असू शकतो जसं ते त्यांना पाठीला किंवा मानेला दुखणं असू शकतो किंवा पायाला दुखणं असू शकतं तर याविषयी तुम्ही आमच्या असिस्टंट कल्पना द्या त्यामुळे तुम्हाला आरामात ज्याप्रमाणे झोपता येईल त्याची व्यवस्था आम्ही करू त्यासाठी डोक्याखाली उशी लागत असेल पायाखाली काही त्याला एक उशी लागत असेल तर त्याची व्यवस्था आम्ही करू तुम्हाला जर ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्यावर जास्ती थंडी वाजत असेल कारण ऑपरेशन थिएटर हे एअर कंडिशन असतं त्याचं टेंपरेचर आम्हाला मेंटेन करावं लागतं तर जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर त्याची सुद्धा कल्पना तुम्ही असिस्टंट द्या त्यासाठी स्पेशल पांघरुणाची आम्ही व्यवस्था तुमच्यासाठी करून ठेवू ऑपरेशनच्या पूर्वी आम्ही डोळ्यामध्ये पुन्हा निर्जंतुकी करण्यासाठी काही ड्रॉप्स घालतो आणि डोळ्याच्या बाजूचा भाग आम्ही ह्या ड्रॉप्स किंवा औषधाच्या सहाय्याने निर्जंतुक करून घेतो हे ड्रॉप घालताना काही वेळा सुरुवातीला थोडसं चरचरल्यासारखं वाटू शकतं जर तुम्हाला चरचरत असेल तर तुम्ही त्याची माहिती आमच्या मदतनिसांना द्या जेणेकरून ते बधीर करण्याचे ड्रॉप्स अधिक प्रमाणात तुमच्या डोळ्यात घालू शकतात हा डोळ्याचा भाग ज्यावेळी आम्ही निर्जंतुक करतो त्यानंतर काही अवधीसाठी आम्हाला थांबावं लागतं जेणेकरून हे निर्जंतुकीकरणाचे प्रोसिजर पूर्ण कम्प्लीट होतं या दरम्यानच्या काळात जर तुम्हाला डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इरिटेशन असेल किंवा खाज सुटत असेल तर त्याची तुम्ही माहिती आमच्या असिस्टंट द्या पण अशा वेळी हात वर घेऊन डोळ्याला त्याचा स्पर्श करणं हे टाळा त्याचं कारण आपण जर तो भाग निर्जंतुकीकरण केला असेल आणि परत तुम्ही त्याला हात लावला तर आपल्याला ही प्रोसिजर पुन्हा करावी लागते याचं कारण असं आहे की एकदा त्याला हात लागल्यानंतर हा निर्जंतुक भाग निर्जंतुक राहत नाही आणि त्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो त्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास असेल तर तुम्ही तोंडानं त्याच्याविषयीची कल्पना आपल्या डॉक्टरना किंवा आमच्या असिस्टंट द्या जेणेकरून त्याच्या विषयीची अधिक काळजी ते घेऊ शकतात ऑपरेशन चालू व्हायच्या आधी आम्ही डोळ्याच्या बाजूला एक ड्रेप लावतो जेणेकरून ऑपरेशनच्या दरम्यान पूर्ण निर्जंतुकीकरण होतंय आणि ते मेंटेन राहतंय याची आम्ही काळजी घेतो आता हा ड्रेप लावण्यापूर्वी तुम्हाला आमचे असिस्टंट डोळा मोठा उघडायला सांगतील अशा वेळी हा डोळा जितका जमेल तेवढा मोठा उघडणं हे फार गरजेचं असतं कारण याच्यामुळे हा ड्रेप आपला व्यवस्थित राहतो आणि त्याचप्रमाणे आपल्या पापण्या या आपल्या ऑपरेशनच्या भागापासून दूर होतात ज्यामुळे आम्हाला ऑपरेशन करण्यास अधिक सुविधा होते त्यामुळे अशा वेळी ज्यावेळी ड्रेप लावता त्यावेळी आपण स्वतःहूनच डोळा जेवढा मोठा उघडा ठेवता येईल तेवढा उघडा ठेवा ड्रेप लावल्यानंतर आम्ही एक छोटासा स्पेक्युलम किंवा ज्याला आम्ही छोटीशी क्लिप म्हणतो तर ती आम्ही पापण्यांना लावतो याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे दुखणं किंवा त्रास जाणवत नाही फक्त ज्यांचे डोळे खूप बारीक असतील त्यांना थोडासा स्ट्रेच जाणवू शकतो कारण आपल्याला ऑपरेशन करण्यासाठी थोडीशी जागा या पापडण्यांच्या मध्ये तयार करावी लागते ज्यावेळी हा स्पेक्युलम लावतो त्यावेळी तुम्ही शक्यतो डोळा चांगला मोठा उघडा ठेवण्याचीच गरज असते जे तुमचं नॉर्मल ब्लिंकिंग असतं ते बऱ्याचदा आम्ही डोळ्यामध्ये बधीरपणाचे ड्रॉप्स घातल्यामुळे कमी झालेलं असतं तुमचं नॉर्मल ब्लिंकिंग तुम्ही मध्ये केलं तरी चालतं पण स्पेक्युलम किंवा क्लिप असल्यामुळे तुमचे डोळे मिटत नाहीत पण स्वतःहून डोळे मिटण्याचा प्रयत्न करणं किंवा आम्ही जी क्लिप लावली आहे त्याच्यावर प्रेशर देणं हे तुम्ही टाळा कारण याच्यामुळे तुमच्या डोळ्याला जास्त त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे ऑपरेशन दरम्यान तुम्ही जेवढे डोळे शांतपणे मोठे उघडे ठेवाल तेवढा ऑपरेशन सुलभ होतं आणि तुम्हालाही त्याचा त्रास होत नाही ऑपरेशनच्या दरम्यान डोळा जितका जमेल तेवढा स्थिर ठेवा ऑपरेशनच्या वेळी तुम्हाला समोर या ब्राईट लाईट किंवा बल्ब दिसत असतील तर त्याकडे तुम्ही एकटक पाहण्याची गरज असते ज्याच्यामुळे ऑपरेशन जास्त सुलभ होतं अर्थात काही पेशंटना या डोळ्यावर आपला कंट्रोल नसतो आणि ते डोळे हलत असतात पण त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही आमचे तज्ञ डॉक्टर याच्यातून सुद्धा मार्ग काढतात आणि तुमच्या ऑपरेशनला याच्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही पण जितकं जमेल तेवढे शांतपणे दोन्ही डोळ्यांनी समोर पाहत राहणं हे ऑपरेशनच्या वेळी असलं तर हे ऑपरेशन जलद होतं आणि त्यामुळे तुम्हाला त्रासही होत नाही ऑपरेशनच्या दरम्यान तुम्हाला कुठलंही दुखणं जाणवणार नाही काही रुग्णांना जे सेन्सिटीव्ह असतात त्यांना डोळ्यामध्ये थोडसं प्रेशर जाणवू शकतं तुम्हाला जर ऑपरेशनच्या दरम्यान कुठलंही दुखणं थोडसं जास्त वाटत असेल किंवा प्रेशर जास्त वाटत असेल असेल तर त्याची कल्पना तुम्ही डॉक्टरांना द्या जरुरत लागल्यास तुम्हाला ते अधिक बधीरपणाचे ड्रॉप्स घालू शकतात किंवा अगदी क्वचित प्रसंगी ते तुम्हाला अधिक बधीरपणाचा औषध देऊन हा डोळ्याचा पूर्ण भाग बधीर करू शकतात अर्थात याची गरज खूपच कमी रुग्णांना लागते ऑपरेशन करताना तुम्हाला कुठलीही हालचाल करायची असेल जसं तुम्हाला काही वेळा पाठी दुखत असतं वयस्कर लोकांना पाय दुखत असतात किंवा त्यांना डोक्याची हालचाल करायची असते की डोकं अवघडलेला असतो असतं तर लक्षात घ्या तुम्ही ऑपरेशन टेबलवर झोपल्यानंतर तुम्ही पायापासून डोक्यापर्यंत कुठलीही हालचाल केली तर तुमचे डोळे आणि डोकं हे हलत असतं आणि त्यामुळे ऑपरेशन करताना त्रास होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला हलायचं असेल तर त्याची पूर्व कल्पना डॉक्टरांना द्या जेणेकरून डॉक्टर त्यावेळी काही कारणासाठी काही वेळासाठी ऑपरेशन थोडसं थांबवतील आणि त्यानंतर तुम्ही हालचाल करू शकता काही वेळा काही पेशंटना ऑपरेशन चालू असताना एकदम खोकला येणं किंवा शिंक येणं हे होऊ शकतं जर असं वाटत असेल तुम्हाला तर लगेचच तुम्ही डॉक्टरांना कल्पना द्या की मला खोकला येतोय किंवा शिंक येईल असं वाटतंय तर अशा वेळी सुद्धा डॉक्टर थोडा वेळ थांब ऑपरेशन थांबून तुम्हाला खोकला येत असेल किंवा शिंक येत असेल तर त्यासाठी थांबवू शकतात परंतु अचानक न सांगता खोकणं किंवा शिंकणं किंवा डोकं आणि शरीर हलवणं हे टाळा ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला डोळ्यामध्ये आणखी ड्रॉप्स घातले जातील आणि डोळा क्लीन केला जाईल यावेळी डोळा जास्ती करून मिटून ठेवा डोळा एकदा क्लीन केल्यानंतर तुम्ही नेहमीप्रमाणे डोळ्याची उघडजाफी करू शकता ऑपरेशन झाल्या झाल्या पुढचे काही मिनिटं तुम्हाला थोडासा डोळ्यासमोर अंधार वाटू शकतो याचं कारण असं असतं की ऑपरेशनच्या वेळी आम्ही ब्राईट लाईटचा वापर ऑपरेशनच्या वेळी करत असतो त्याचप्रमाणे आम्ही डोळ्याची बाहुली मोठी करून ठेवलेली असते त्यामुळे ते पूर्ववत होण्यासाठी थोडासा कालावधी लागतो त्यामुळे यामुळे घाबरून जाण्याची बिलकुल गरज नाही ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा डे केअर वॉर्ड मध्ये नेऊन नेण्यात येईल सुरुवातीच्या काळात थोडसं डोळ्यातून टोचणं पाणी येणं हे नॅचरली होतं आणि हे शक्यतो पहिल्या एक दोन दिवसांमध्ये हळूहळू कमी होऊन जातं यासाठी लागणारी औषध आम्ही ऑपरेशन नंतर तुम्हाला चालू केलेलीच असतात जर तुम्हाला डोळ्याला कुठल्याही प्रकारचं दुखणं जाणवत असेल तर तुम्हाला दुखण्याची दुखणं कमी करण्याची गोळी सुद्धा दिलेली असते ऑपरेशनच्या दिवशी बाहुली मोठी असल्यामुळे थोडसं धुरकट डिश हे साहजिक असतं जशी जशी बाहुली पूर्ववत होते आणि डोळ्याची सूज कमी होते तशी तुमची दृष्टी हळूहळू वाढत जाते याविषयी तुम्हाला घाबरण्याची कुठलीच गरज नाही ऑपरेशन नंतर तुमचा जो चेकअप आहे ते डॉक्टर करतील आणि त्यानंतर तुम्हाला डिस्चार्ज पेपर्स मिळतील या डिस्चार्ज पेपर मध्ये तुमचं झालेला ऑपरेशन बसवलेली लेन्स याची सर्व माहिती दिलेली असते तसेच सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कुठल्या दिवशी फॉलो अपला यायचंय आणि जर तुम्हाला कुठलाही त्रास असेल तर कुठल्या इमर्जन्सी नंबर वर कॉन्टॅक्ट करायचा आहे याची माहिती सुद्धा या डिस्चार्ज पेपर वर लिहून दिलेली असेल याची सर्व माहिती आमचे सहाय्यक तुम्हाला देतीलच त्याची तुम्ही जाण्यापूर्वी सर्व खात्री करून घ्या जाताना तुम्हाला जी फॉलो अप ची डेट दिलेली असेल जर त्या दिवशी तुम्हाला येणं जमत नसेल तर तुम्ही आधीच ही डेट चेंज करून घेऊ शकता किंवा आमच्या ओपीडी मध्ये कॉल करून तुम्ही ही डेट बदलून घेऊ शकता ऑपरेशन नंतर सुद्धा जी तुमची शरीराची औषध औषध आहेत ती पूर्व चालू ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं जर तुम्हाला रक्तपातळ करायची गोळी बंद केलेली असेल तर ती केव्हा चालू करायची याची तुम्ही कल्पना डॉक्टरांकडून घ्या आणि त्याप्रमाणे ती पुन्हा चालू करायची असते तुम्हाला डोळ्याची आधी काही औषध चालू असतील जशी काचबिंदूची औषध डोळा कोरडा होण्याची औषध किंवा डोळ्याच्या इतर आजारांसाठी असलेली औषध ही पूर्वीसारखीच ऑपरेशन नंतर सुद्धा चालू ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं त्याविषयी कोणती शंका असेल तर तुम्ही डिस्चार्ज होण्यापूर्वीच डॉक्टरांना किंवा त्यांच्या असिस्टंट याविषयी विचारून घ्या ऑपरेशन नंतर जास्ती त्रास कुणालाच होत नाही परंतु काही गोष्टी जर तुम्हाला ऑपरेशन नंतर घरी गेल्यावर किंवा पुढच्या पाच ते सात दिवसात जाणवत असतील जसं डोळ्यापुढे अंधुकता वाढणे दुसरं डोळ्याला लाईटचा त्रास वाढणे आणि तिसरं डोळ्याला दुखणं जास्त वाढणे याविषयी असं काही तुम्हाला वाटतं वाटत असेल तर तुम्ही त्वरित इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर वर कॉल करा याविषयीचा पुढचं जे मार्गदर्शन आहे ते आमचे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर वर तुम्हाला देण्यात येईल तर तुमचं जे ऑपरेशन आहे ते नक्कीच अतिशय छान सुरळीतपणे पार पडणार आहे यासाठी आमची पूर्णच टीम ही कार्यरत राहणार आहे याविषयी तुम्हाला आणखी कुठल्याही शंका असतील तर तुम्ही नक्की ऑपरेशनच्या दिवशी आमच्या सर्व सहाय्यकांना आणि डॉक्टर्सना विचारू शकता तुमची डोळ्याची जी जी हेल्थ आहे निरोगीपणा आहे हा नक्की लवकरात लवकर परत यावा हीच आमची शुभेच्छा धन्यवाद
source