Nandadeep Netralay

Chaalishi Nantar Chashma Ka Lagto? Presbyopia And Glasses Options Explained | Dr. Sourabh Patwardhan



Chaalishi Nantar Chashma Ka Lagto? Presbyopia And Glasses Options Explained | Dr. Sourabh Patwardhan

#Chaalishi #Nantar #Chashma #Lagto #Presbyopia #Glasses #Options #Explained #Sourabh #Patwardhan

चाळीशीनंतर अनेक लोकांना वाचनाचा, लांबचा किंवा प्रोग्रेसिव्ह चष्म्याची गरज भासते. यामागचं मुख्य कारण म्हणजे प्रेसबायोपिया, ज्यामुळे डोळ्यांची जवळची दृष्टी कमकुवत होते. या व्हिडिओमध्ये डॉ. सौरभ पटवर्धन प्रेसबायोपिया म्हणजे काय, चाळीशीनंतर डोळ्यांमध्ये होणारे बदल, तसेच वाचनाचा, लांबचा व प्रोग्रेसिव्ह चष्म्याचे प्रकार आणि त्यांचे फायदे याबद्दल सविस्तर माहिती देतात.
जर तुम्हाला चाळीशीनंतर डोळ्यांच्या दृष्टीमध्ये बदल जाणवत असतील किंवा योग्य चष्म्याची निवड करण्याबद्दल शंका असेल, तर हा व्हिडिओ नक्की पाहा!
Join Dr. Sourabh Patwardhan in this in-depth podcast episode as he discusses Presbyopia, a common age-related vision condition. Learn about its causes, symptoms, and available treatment options to regain clear vision.
What You’ll Discover:
• What is Presbyopia?
• Why does it occur after the age of 40?
• Common signs and symptoms
• How is it diagnosed?

Whether you’re experiencing difficulty focusing on close objects or simply curious about eye health, this episode provides valuable insights straight from an expert.
👉 Subscribe for more expert eye care tips and stay updated on the latest advancements in ophthalmology!
#presbyopia #glasses #nandadeepeyehospital #eyecare #treatment #causes #symptoms #drsourabhpatwardhan

timestamps
00:00 – Intro
00:46 – जवळच्या नंबरच्या चष्म्याची लक्षणे काय असतात?
01:37 – Accommodation Amplitude म्हणजे काय ?
02:12 -जवळचे काम जास्त वेळ केल्याने तुमचे डोके दुखत असेल
तर तुम्हाला जवळचा चष्मा लागलेला आहे
03:00 – चाळीशी नंतरचा चष्मामध्ये काय पर्याय असतात ?
03:57 – Reading Glasses (वाचनाचे चष्मे) फायदे व तोटे
05:10 – बायफोकल चष्म्याचे फायदे व तोटे
08:22 – प्रोग्रेसिव्ह चष्म्याचे फायदे व तोटे
10:30 – प्रोग्रेसिव चष्म्याचे प्रकार
14:40 – प्रोग्रेसिव चष्मा Adapt न होण्याचे कारणे

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.

Email: nandadeepeyehospital@gmail.com

✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.

Transcript :-

नमस्कार आज जो आपण व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे तो म्हणजे एक खूप कॉमन प्रश्न जो सगळ्यांना जसं मी आणि इकडे माझ्याबरोबर डॉक्टर निधी आहेत तर आमची आता 40 उलटलेली आहे त्यामुळे आम्हालाही हा कॉमन प्रश्न आम्हालाही पुढे येतोय तो म्हणजे 40 चा चश्मा म्हणजे ज्याला आम्ही इंग्लिश मध्ये प्रेस बायोपिक चश्मा किंवा प्रेसबायोपिक स्पेक्स म्हणतो तर याविषयी आपण आज डिस्कस करणार आहे तर याच्याविषयी बऱ्याच लोकांना प्रश्न असतात की कुठला चश्मा वापरावा नेमके काय त्रास होतात आणि डॉक्टर्स काय रेकमेंड करतात आणि असे बरेच काय काय प्रश्न आहेत तर आपण निधी मॅडमना विचारूया की असे जे पेशंटचे प्रश्न आहेत ते तुम्ही आमच्या समोर ठेवा म्हणजे आपण याच्याविषयी सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करूया मग तुम्हाला काय सिम्पटम्स वाटले की तुम्हाला असं वाटलं की मी जवळच्या चश्मा चश्मा लागतो येस तर आता मला स्वतः म्हणजे मी डॉक्टर आहे मी रोज ऑपरेशन्स करतो मला लांबचं माझं जो जो लांबचाही छोटा नंबर आहे त्यानं मला एकदम क्लिअर दिसत होतं आणि जवळचं जर मी पाहिलं तर मला वाचताही इझिली येत होतं परंतु काय व्हायचं की जसं जसा संध्याकाळ होईल जसं मी जास्त वाचन करायचो किंवा बरीच ऑपरेशन झाली आज तर मला हळूहळू डोकेदुखी चालू व्हायची म्हणजे डोकं थोडसं जड वाटायचं डोकं दुखणं पर्टिक्युलरली हा भाग डोळ्याच्या वरचा भाग दुखणं चालू व्हायचं मला आणि त्यानंतर मग मी अर्थातच मी चेक केलं की माझी जवळची दृष्टी कशी आहे तर मला असं जाणवलं की चश्म्यानं पण मला दिसतंय जवळचं पण ज्यावेळी मी कंटिन्यूअसली जवळचं वाचतो त्यानंतर हा त्रास चालू होतो मग त्यानंतर आम्ही चेक केलं की माझा अकोमोडेशन एम्प्लीट्युड किती आहे म्हणजे काय असतं की आपण एखादी जवळची गोष्टी पाहत असू तर आपल्या डोळ्याला नॅचरल डोळ्याला एक फोकसिंग पावर असते आणि त्याच्यातून ते आपण फोकस करत असतो जवळच्या गोष्टीवर पण ही फोकस झाल्यावर सुद्धा ती किती काळ सस्टेन होते हे पण महत्त्वाचं आहे म्हणजे आपले फोकस करतो पण थोड्या वेळाने जर आपल्याला थकवा येत असेल तर याचा अर्थ सुद्धा आपल्याला जवळचा चश्मा लागलाय हं असा होतो आणि मी बरेचदा ओपीडी मध्ये सुद्धा असे पेशंट पाहिलेत की जे बऱ्याचदा म्हणजे डिनाईल मध्ये असतात की त्यांना डोकं दुखत असतो त्रास होत असतो पण तरीसुद्धा ते म्हणतात नाही मला जवळचं दिसतंय मला काही चश्मा नको तर हा सगळ्यात मोठा आय थिंक सिम्टम आहे की तुमचं जर डोकं दुखत असेल खास करून जवळचं काम जास्त वेळ केल्यानंतर तर तुम्हाला जवळचा चश्मा लागलाय दुसरं हे जे दुखण्याचे जे प्रकार आहेत ना ते एकदम टिपिकल आहेत म्हणजे खास करून असे डोळ्याच्यावर ज्याला आम्ही ब्रोक म्हणतो म्हणजे भुवईच्या वर दुखणं काही व्यक्तींना इव्हन मान दुखते कारण काय होतं की ज्यावेळी आपण फोकस करत असतो आणि आपण जास्त ताण देतो त्यावेळी काही वेळा मानेवर सुद्धा ताण येतो आणि मान सुद्धा अशा लोकांची दुखू शकते तर हा एक खूप कॉमन सिम्टम आहे जो प्रेस बायोपी म्हणजे जवळचा नंबर लागण्याची लक्षणं आहेत म्हणजे बऱ्याचदा जवळचं अंधूक होणं हा कदाचित लेट सिम्टम आहे म्हणजे ऑलरेडी त्यांना जवळचा चश्मा लागून बरेच दिवस झाल्यानंतर त्यांना जवळचा अंधूक व्हायला ऍक्च्युली चालू होतं मग त्याच्यात ट्रीटमेंट म्हटलं तर फर्स्ट ऑप्शन आपल्याला येतंय की चश्मा लागायचा करेक्ट मग चश्मेमध्ये काय ऑप्शन आहे आपल्याकडे राईट सो आता तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वर्षांपासून एक खूप चांगली ट्रीटमेंट जवळच्या नंबर साठी उपलब्ध आहे ती म्हणजे चश्मा बरोबर म्हणजे मला आश्चर्य वाटतं की मे बी बेंजामिन फ्रँकलिन चश्म्याचा पहिल्यांदा शोध लावला त्याच्या आधी लोक काय करत असतील म्हणजे 40 झाल्यावर तर त्यांचे अतिशय भयंकर त्रास होत असणार आहे त्या कारण हे ज्याला 40 लागली आहे म्हणजे 40 जवळचा नंबर लागलाय त्यावेळी जो पहिल्यांदा जो जवळचा चश्मा घालून त्याला जे रिलॅक्सेशन वाटतं डोळ्याला वाचताना तर ते खूप छान असतं तर आता हे चश्म्या ज्यावेळी आपल्याला चश्मा लागलाय आता जवळचा आणि हे एक्सेप्ट केलंय आपण की आता मला जवळसाठी चश्मा लागणार आहे तर त्याला तीन महत्त्वाच्या म्हणजे टाईपचे चश्मे आहेत जे अवेलेबल आहेत आणि जे आपण वापरू शकतो सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना दूरचा चश्मा बिलकुल नाही म्हणजे आतापर्यंत त्यांनी कधीच चश्मा वापरलेला नाही ओके तर बऱ्याचदा त्यांना असं असतं की नाही मला फक्त तेवढ्या पुरताच वापरायचा चश्मा इतर वेळी काय मी चश्मा वापरणार नाही तर बऱ्याचदा त्यांना एक ऑप्शन हा अवेलेबल असतो हा रेडीमेड चश्म्यांचा म्हणजे याच्यामध्ये काय असतं की फक्त जवळचा चश्मा दिलेला असतो ओके याच्यामध्ये काही डिसएडवांटेजेस आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा माझ्याकडे फक्त हा जवळचा चश्मा आणि मी तो घालतोय आणि मी समजा कॉम्प्युटर वापरायला किंवा वाचताना वापरतोय तो पण ज्यावेळी आपल्याला दूरचा बघायचं असतं त्यावेळी आपल्याला काय करायचं असं करून बघावं लागतं त्यामुळे मग अशी सवय लागते की वाचताना आपण असं करतोय आणि वरण आपण सारखं बघतोय याच्यात एक असतं की याची जी ऍडिशन पावर आहे ती मात्र तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या कारण खूप हायर किंवा खूप लोअर ऍडिशन असेल तरीसुद्धा तुम्हाला याच्यामुळे त्रास होऊ शकतो सो प्रॉपर नंबर तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडून किंवा ऑप्टोमेट्रिस्ट कडून चेक करा आणि मग तुम्ही हा वापरू शकता चश्मा ओके पण मी मगाशी सांगितलं तसं आपल्याला लांबचं आणि जवळचं एकत्रच पाहिजे आता बऱ्याच लोकांना लांबचा चश्मा ऑलरेडी असतो नंबर असतो आणि आता त्यांना जवळचा लागलेला असतो तर अशा लोकांसाठी दोन पद्धतीचे चश्मे उपलब्ध आहेत त्यातली एक जी पूर्वीपासून चालू आलेली पद्धत आहे ती म्हणजे बायफोकल ग्लासेस ओके ही बायफोकल ग्लास मध्ये काय असतं खालच्या बाजूला एक गोल हे सर्कल असतं ज्याच्यामधून आपल्याला जवळच दिसत असतं आणि जो वरचा भाग असतो त्याच्यातून आपल्याला दूरच दिसत असतं काही वेळा याचं डी बायफोकल पण असतं म्हणजे हे सर्कल पेक्षा हे उलटं हेमी सर्कल किंवा काही एक्झिक्युटिव्ह म्हणजे पूर्ण अर्धा खालचा भाग आहे जवळचा असे याचे काही प्रकार उपलब्ध आहेत याचा फायदा असा आहे फायदा हा आहे की आपल्याला लांबचं बघायसाठी असं करून बघायची गरज नाही कारण लांबचा नंबर आपल्याला दिलेला आहे जवळचं बघताना मात्र आपल्याला एक काळजी याच्यामध्ये म्हणजे ज्याचा एक डिसएडवांटेज असा आहे की ज्यांना कॉम्प्युटर स्क्रीन युज आहे म्हणजे ज्याला आम्ही इंटरमीडिएट डिस्टन्स म्हणतो म्हणजे थोडसं आपल्याला हाताच्या अंतरावर किंवा लांब धरायची गोष्ट असते त्याला जर तुम्हाला ह्याच्यातून बघायचं असेल तर बऱ्याचदा तुम्हाला असं मान करून पुढे जाऊन असं वाचावं लागतं ओके म्हणून अशा लोकांना बऱ्याचदा मानेचा त्रास चालू होतो कारण ही आपली जी मानेची स्थिती आहे ही नैसर्गिक नाहीये आणि त्यामुळे आपल्या मानेचे जे बोन्स आहेत आणि डिस्क आहेत त्याच्यावर जास्त प्रेशर येऊ शकतं आणि सतत असं वापरल्यामुळे मानेचा त्रास अशा लोकांना चालू होतो तसंच या सगळ्या थकव्यामुळे पुन्हा डोकं दुखू शकतं तर हा याचा एक डिसएडवांटेज आहे आणखी याचा एक डिसएडवांटेज म्हणजे जर आम्ही आपण जिन्यावरनं खाली उतरतोय चढतोय ओके दुसरं आपण जरी वाहन चालवतोय कुठलंही तर त्यावेळी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की वरचा जो भाग आहे तो फक्त डिस्टन्स म्हणजे लांब लांब कशाला म्हणतो आपण 1 मीटर पेक्षा जे काही दूरच आहे ते सगळंच लांब आहे म्हणजे आपण जर गाडी चालवतोय तर गाडीच्या समोर आलेली कुठली व्यक्ती किंवा वस्तू ही आपल्या दृष्टीने लांब आहे जरी ती चाकाच्या जवळ असली तरी 1 m अंतरावर आहे याचा अर्थ आपल्याला ती या भागातूनच बघायला पाहिजे त्यामुळे गाडी चालवताना थोडीशी मान आपल्याला खाली ठेवून मगच चालवावी लागते नाहीतर मग बऱ्याच पेशंटची तक्रार असते की मी जर ही गाडी चालवताना आपण जर मान अशी करत असू तर सगळं वर खाली दिसतं म्हणजे सगळीकडे स्पीड ब्रेकर दिसायला लागतात त्यामुळे हे लक्षात घ्या तुम्हाला ज्यावेळी गाडी चालवायची आहे त्यावेळी थोडीशी मान खाली घेऊन आपल्याला वरच्यातूनच पाहायला पाहिजे त्याचप्रमाणे जिन्यावरनं खाली उतरताना सुद्धा असं करून बघायला पाहिजे बऱ्याचदा आपण असं करून चालायला लागतो जिन्यावरनं खाली कारण ही सवय असते जर पूर्वी आपण लांबचा जवळचा वापरलेला नसू फक्त लांबचा वापरला असू तर आपण असं चालत जातो आणि त्यावेळी पुन्हा जिना म्हणजे जिन्याची पायरी चुकायची शक्यता असते तुम्हाला तुम्ही धडपडू शकता पडू शकता त्यामुळे जिन्यावरनं खाली उतरणं सुद्धा आपल्याला असं मान खाली करून खाली जाणं म्हणजे खाली उतरणे हे महत्त्वाचे आहे चढताना बऱ्याच लोकांना त्रास होत नाही कारण नॅचरली आपण वर जात असतो जिनाने आपल्याला दिसत असतो पण त्यावेळीसुद्धा जे वयस्कर लोक आहेत त्यांनी परत खाली बघून एक एक पायरी बघून वर चालत जाणं हे अपेक्षित आहे तर याचे हे दोन-तीन या चश्म्याचे आहेत आणि सगळ्यात मोठा ऍडवांटेज असा आहे की दिसतं समोरच्या माणसाला लक्षात येतं की बाबा याची चाळीशी उलटलेली आहे हा आता वय झालेला आहे आणि ते गोल आहे याचा अर्थ त्यांना बायफोकल वापरलाय तर एक तर स्टाईल बेटर करण्यासाठी आणि तसेच काही ऍडिशनल एडवांटेज असणारा चश्मा उपलब्ध आहे त्याचं नाव आहे प्रोग्रेसिव्ह स्पेक्स ओके तर हा प्रोग्रेसिव्ह जो स्पेक्स असतो जो अर्थात मी सुद्धा स्वतः वापरतो याचा एडवांटेज काय आहे की याच्यामध्ये लांबची दृष्टी आणि जवळची दृष्टी ही दोन्ही एकाच नंबर मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये एक इंटरमीडिएट झोन सुद्धा आहे ओके जो आपल्याला साधारणतः 60 70 सेंटीमीटर पुढे च्या वाचण्यासाठी उपयोग आणि हे जो चेंज होतोय नंबर तो ग्रॅज्युअली म्हणजे स्लोली चेंज होतोय आणि तो एकदम चेंज होत नाही जसा गोल असतो तसा काही दिसत नाही त्यामुळे समोरच्या माणसाला हे लक्षात येत नाही की यानं 40 चा नंबर घातलाय का रेग्युलर चश्मा घातलेला आहे त्यामुळे मला वाटतं एक फॅशनच्या दृष्टीने सुद्धा इट लुक्स बेटर की तुमच्या पर्सनालिटीला तो मॅच होतो आणखी त्याच्यावरून अर्थात महत्त्वाचा एक अडवांटेज असा आहे की ज्यांना डेस्ट जॉब आहे ज्यांना कॉम्प्युटर बघायचं आहे दूरच बघायचं आणि खूप जवळचे लिहायचं आहे यांना एडवांटेज असा आहे मी मगाशी जो बायफोकल चश्मा आपण बघितला त्याच्यामध्ये मी सांगितलं की त्यांना बऱ्याचदा कॉम्प्युटर बघायला असं करून बघावं लागतं त्याचा याच्यामध्ये जो डिसएडवांटेज आहे तो निघून जातो कारण याला इंटरमीडिएट झोन दिलेला असल्यामुळे आपण सरळ बघून म्हणजे सरळ डोकं ठेवून सुद्धा जस्ट डोळा जरी खाली नेला आणि आपल्याला कॉम्प्युटर त्याबरोबर डिस्टन्सला सेट असेल तर आपल्याला कॉम्प्युटर अगदी आरामात दिसू शकतो आपल्याला असं करून बघायची गरज लागत नाही आणि त्यामुळे ऑर्गोनॉमिकली म्हणजे आपल्याला डोक्याची पोझिशन बसण्याची पोझिशन हे डेस्क युजर्सना खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे खूप फायदा होतो त्यामुळे धिस इज ऑफकोर्स एडवांटेजेस तिसरा मी सांगितलं जसं गाडी चालवताना किंवा जिन्यावरनं खाल उतरताना चढताना याला सुद्धा सिमिलर इशू असतोच म्हणजे तुम्हाला खाली जर तुम्ही बघितलं खालच्या म्हणजे जवळच्या याच्यातून तर तुम्हाला वर खाली दिसू शकतं रिलेटिव्हली बायफोकल पेक्षा ह्याच्यामध्ये जम्प स्लो होतो कारण ग्रॅज्युअली वाढत जातो त्यामुळे पण तरीसुद्धा तुम्हाला जिन्यावरन उतरताना गाडी चालवताना थोडसं डोकं खाली घेऊन वरच्या भागातून बघणं हे फार महत्त्वाचं आहे तर हे जे फर्स्ट टाईम युज करत असतील अशा टाईपचा चश्मा यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला हा चश्मा अडॅप्ट होणं हे अतिशय इझी होऊन जातं ओके प्रोग्रेसिव्ह टाईप्स पण असतात तर काय असतं ते सो आता अर्थातच जस जसं टेक्नॉलॉजी इम्प्रूव होत झाली आहे आणि चश्म्यामध्ये बरेचशे प्रकार यायला लागले तसे प्रोग्रेसिव्ह स्पेक्सचे सुद्धा बरेच प्रकार आहेत अर्थात वेगवेगळ्या कंपन्या हे प्रकार उपलब्ध करून देतात पण मी कंपन्यांपेक्षा त्याची जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्याविषयी सांगतो सो मी ज्यावेळी स्वतःचा चश्मा घ्यायला गेलो त्यावेळी मी विचारलं त्यांना की काय टाईपचे उपलब्ध आहेत तर याच्यात मेन जे प्रकार होतात ते ट्रांजिशन म्हणजे जवळचे आणि लांबचं जे चश्माचा नंबर आहे त्याच्यातल्या ट्रांजिशन मध्ये होतात ओके सो मी जो घेतलाय तो वाईट झोन प्रोग्रेसिव्ह घेतलाय म्हणजे याचा अर्थ काय की याच्यामध्ये दूरचा नंबर आणि जवळचा नंबर याच्यामध्ये जो गॅप असतो ब्रिजिंग गॅप असतो त्याचा साईडनं एक अब्रेशन तयार होतं म्हणजे थोडासा तिथे कर्वेचर चेंज होत असताना जो पार्ट असतो तिथे आपल्याला ब्लर दिसतं त्या भागात ओके ज्यावेळी हा ब्लर दिसणारा भाग मिनिमम केला जातो त्यावेळी आपल्याला जास्त कम्फर्ट येतं चश्मा वापरताना ओके याचा अडवांटेज काय होतो मी सांगतो तर सगळ्यात पहिल्यांदा अडॅप्टेशनला प्रॉब्लेम काय होतो ज्यावेळी आपण प्रोग्रेसिव्ह पहिल्यांदा घेतो आणि ज्यावेळी तुम्ही जर योग्य प्रोग्रेसिव्ह जर वापरत नसाल त्यावेळी तर प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही जरा जरी डोळा हलवला तरी तुम्हाला सगळं वे दिसायला लागतं ओके त्याचं कारण असं आहे की कुठलाही प्रोग्रेसिव असला तरी त्याला दूरची दृष्टी आहे ती सेंटरच्या भागातूनच क्लिअर असते ज्यावेळी आपण डोळा हलवतो त्यावेळी हा आपण इंटरमीडिएट झोन मधून पाहायचा प्रयत्न करत असतो ओके आणि त्यावेळी वेविनेस जाणवू शकतो हा वेनेस ज्यावेळी आपण हायर बेटर क्वालिटीचे प्रोग्रेसिव्ह घेतो जसं मी म्हटलं वायडर झोनचे प्रोग्रेसिव्ह त्यावेळी हा वेनेस तुलनेनं कमी होतो पण थोडासा असणारच कारण त्याच्यामध्ये आपण हळूहळू ट्रांजिशन देतो पण हा खूप कमी असतो त्यामुळे पहिली सवय आपल्याला काय लावायची आहे ज्यावेळी आपण पूर्वी आपण फक्त सिंगल विजन वापरत होतो किंवा वापरतच नव्हतो चश्मा दूर साठी त्यावेळी काय व्हायचं की तुम्ही डोळा जरी हलवलात कुठेही बघितलं तरी तुम्हाला सेमच दृष्टी दिसायची कारण पूर्ण याच्यामध्ये एकच नंबर होता बरोबर त्यामुळे आपल्याला सवय काय असते की आपण बसलोय आणि कुणाकडे इकडे बघतोय तर आपण डोळे हलवून बघतो ओके पण प्रोग्रेसिव्ह मध्ये जर आपण असं डोळा हलवून बघितला तर काय होतं आपण त्या इंटरमीडिएट झोन मधून किंवा त्या ट्रांजिशन झोन मधून बघतोय आणि त्यामुळे आपल्याला सगळं ब्लर दिसतं तर अशा वेळी आपल्याला एक बदल काय करायचा आहे की डोळे नुसते न हलवता थोडसं आपल्याला डोकं हलवून चश्म्याच्या सेंटरच्या भागातून त्या वस्तूकडे किंवा व्यक्तीकडे बघायचंय हा आपल्यातला एक बदल आपल्याला अडॅप्ट करणे गरजेचे आहे ओके सो अडॅप्टेशन मधला हा एक पहिला प्रकार आहे ठीक आहे जे दुसरं अडॅप्टेशन आपल्याला करायचंय ते वाचनाच्या बाबतीत तसंच कॉम्प्युटर युजच्या बाबतीत ओके सो ज्यावेळी आपल्याला जवळचा चश्मा नसतो ओके त्यावेळी आपण काय करत असतो की डोकं असं खाली करतो आणि मग वाचन करतो बरोबर आहे ज्यावेळी आपल्याला प्रोग्रेसिव चश्मा असतो त्यावेळी काय असतं की आपल्याला जवळचं जे आहे ते खालच्या भागातून बघायचं आहे बरोबर त्यामुळे जर मी पूर्वीच्या सवयीप्रमाणे असं पाहिलं तर काय होतं की मी वरच्या भागातूनच वाचतोय याचा अर्थ माझ्या नियरचा जो नंबर आहे त्याच्यातून मी वाचतच नाहीये त्यामुळे काय होणार एक तर क्लिअर दिसणार नाही आणि दुसरा ताण परत पडत राहणार डोळ्यात त्यामुळे वाचताना आपण काय करायचंय पुस्तक इथेच राहील आपण डोकं न हलवता आपण फक्त डोळे हलवायचेत ओके आता काय झालं फक्त डोळे हलवल्यामुळे मी आता जो चश्म्याचा खालचा भाग आहे त्याच्यातून मी आता वाचतोय म्हणजे मला क्लियर दिसतंय आणि मला कुठलाही त्रास होत नाही ओके त्यामुळे हे सेकंड अडॅप्टेशन आपल्याला करणं ज्यावेळी आपण प्रोग्रेसिव्ह चश्मा करतो त्यावेळी गरजेचे आहे तिसरं जे अडॅप्टेशन मी सांगितलं तसं गाडी चालवताना आणि जिन्यावर उतरताना चढताना नेहमी आपल्याला थोडीशी मान खाली घालून चालवलं पाहिजे जसं आपण गाडी चालवतोय ज्यावेळी आपल्याला जवळचा चश्मा नाहीये त्यावेळी आपल्याला सगळं सेम दिसतं बरोबर जवळचा चश्मा आल्यावर जर आपण डोकं थोडसं वर करून पाहिलं तर खालच्या वस्तू दिसतात दिसत नाहीत आलेली व्यक्ती किंवा वाहनं दिसत नाहीत त्यामुळे यू टू बी केअरफुल की नेहमी थोडसं मान आपली खाली घालून बघणे गरजेल या सगळ्या हॅबिट्स म्हणजे आपल्याला अडॅप्टेशन चा पार्ट आहे तर ते प्रोग्रेसिव चश्मेला अडॅप्ट व्हायला किती वेळ लागू शकते सो बऱ्याच लोकांना आता हे जे व्हिडिओ बघत असतील ना त्यांनी सुद्धा बऱ्याच लोकांनी एकदा प्रोग्रेसिव चश्मा ट्राय केला असेल आणि काही जणांना तो बिलकुल अडॅप्ट झाला नाही असं वाटलं असेल ओके सो त्याला मेनली दोन्ही कारण मी म्हणतो की असतात एक मी जसं सांगितलं आता मी ज्या गोष्टी सांगितल्या की आपल्याला मानेची जी हालचाल आहे किंवा पोझिशन जी ठेवायची ही त्यांना माहित नसते ज्यावेळी ते पहिल्यांदा वापरतात कारण दे एक्सपेक्ट की हा लगेच मी घातल्या घातल्या मला चांगलं दिसायला लागेल आणि मी लगेच सूट होईल तसं होत नाही आपल्याला या पहिल्यांदा पहिले आठ दहा दिवस आपल्याला कॉन्शियसली या गोष्टी कराव्या लागतात मला वाचायचंय मला डोळे हलवायचे आहेत मान हलवायची नाही आपण गाडी चालवतोय चालताना उतरतोय आपल्याला मान खाली हलवायची खाली घ्यायची आणि चालाय हे ज्या हॅबिट आहेत ते व्हायला आठ ते दहा दिवस जनरली लोकांना लागू शकतात दुसरं जर चश्मा बनवताना त्याचं सेंट्रेशन करेक्ट नसेल किंवा मी सांगितलं असं थोडेसे लोअर यू नो कॉस्टचे आणि झोन कमी असलेले तुम्ही जर प्रोग्रेसिव्ह सुरुवातीलाच घेतला तर तुम्हाला अडॅप्ट व्हायला आणखी त्रास होतो याचं कारण काय तुमचा झोन खूप नॅरो होऊन जातो आणि त्यामुळे तुम्हाला अडॅप्ट व्हायला आणखी वेळ लागतो सो आय वुड ऍडव्हाइस की गो फॉर बेटर टाईप ऑफ प्रोग्रेस याच्यामध्ये तुम्हाला अडॅप्ट व्हायला थोडासा हेल्प होऊन जाईल ओके अर्थात जरी तुम्ही बेस्ट क्वालिटी प्रोग्रेसिव्ह घेतले तरी पहिलं लक्षात ठेवा की तुमच्या हॅबिट्स आणि जे तुमचे रिफ्लेक्सेस आहेत ते थोडेसे चेंज होणे गरजेचे आहे आणखी एक पॉईंट महत्त्वाचा आहे की तुम्हाला दूरचा कुठल्या टाईपचा नंबर आहे याच्यावर सुद्धा तुमचा अडॅप्टेशन पिरियड अवलंबून असतो फॉर एक्झाम्पल ज्यांना दूरचा बिलकुल चश्मा नाही आणि त्यांना लावायचं आहे तर त्यांना सवयच नसते बिलकुल चश्म्याची सो त्यांना पहिल्यांदा चश्म्याची सवय होणं हे महत्त्वाचं आहे असतं आणि मग ते अडॅप्ट होतात जवळच्या गोष्टीला ओके दुसरं ज्यांना दूरचा प्लस नंबर आहे म्हणजे थोडासा जाड चश्मा आहे मोठा प्लस नंबरचा चश्मा आहे आणि त्यांना आपली नियर ऍडिशन माहिती आहे तुम्हाला आणखी प्लस होते सो अशा वेळी वेनेस थोडासा सुरुवातीला जास्त लागू शकतो आणि अडॅप्टेशन पिरियड जास्त लागू शकतो तसंच ज्यांना सिलेंड्रिकल हाय नंबर आहे त्यांना सुद्धा थोडासा वेनेस जास्त इनिशियली जाणवू शकतो आणि त्यानंतर अडॅप्टेशन व्हायला थोडासा वेळ लागू शकतो जनरली ज्यांचा मायनस नंबर जास्त आहे त्यांना प्रोग्रेसिव अडॅप्टन तुलनेनं कमी वेळ लागतो आणि लवकर अडॅप्ट होतात ते काही लोक विचारतात की आता मी आठ दहा दिवस वापरतोय पण मी बिलकुल अडॅप्ट नाही झालो तर याला मी सांगितलं पहिली दोन कारणं महत्त्वाची एक तर तुम्ही चश्मा व्यवस्थित परत बघून घ्या की त्याचं सेंट्रेशन व्यवस्थित आहे आणि तुम्ही बरोबर टाईपची लेन्स सिलेक्ट केली आहे की नाही ओके ते तुम्ही ऑप्टिकशन बरोबर किंवा ऑप्टोमेट्री बरोबर कन्सल्ट करा आणि दुसरं तुम्ही स्वतः आधी ठरवा की आता मला अडॅप्ट व्हायचंय बरेच लोक काय करतात थोड्या वेळ घालतात आणि परत मग जुना चश्मा लावतात की नाही आता मी त्यालाच मला बेटर वाटतंय तर याच्यामुळे तुमचे अडॅप्टेशन व्हायला खूप वेळ लागतो आणि काही लोकांना असं जरी आठ दहा दिवस आम्ही म्हणतो अडॅप्टेशन साठी काही लोकांना याच्यापेक्षा जास्त काळ सुद्धा अडॅप्टेशनला लागू शकतो पण मग एक प्रश्न आहे ना कशाला अडॅप्ट व्हा यापेक्षा बायफोकलच बरा होताना किंवा फक्त जवळचाच वापरतो ना पण मी सांगितलं असं प्रोग्रेसिव्ह एकदा तुम्ही अडॅप्ट झाला जसं आता मला मी हार्डली दोन दिवसापूर्वी चश्मा घेतलाय आणि मी मस्त अडॅप्ट झालोय कारण मला माहिती आहे याच्या मागची थेअरी काय कसं वापरायचं आणि पटकन अडॅप्ट झालोय याचा ऍडव्हांटेज मेन काय होतं की आपल्याला दोन दोन चश्मे नाही लागत म्हणजे यांना खास करून लांबचा पण चश्मा आहे नाहीतर मग काय करतात त्यांना दोन चश्मे ठेवावे लागतात आता मी हे घालणार हे घालणार पण दैनंदिन व्यवहारात काय होतं की जसं आपण काही ठरवून मोबाईल बघत नाही किंवा ठरवून वाचन करत नाही आपण जाता जाता बऱ्याच गोष्टी करत असतो स्वयंपाक करत असतो वाचन करत असतो मोबाईल मेसेज करत असतो कॉल करत असतो तर या गोष्टी भरताना तुम्ही काय असं बघत नाही की हा मी आता चश्मा जवळचा लावतो आणि आता मी बघतो असं होत नाही त्यांनी त्यामुळे आपण सतत जवळच्या यू नो वस्तू बघत असतो आणि त्याचा ताण डोळ्यावर येणार त्यामुळे दोन सेपरेट चश्मे ठेवणं शक्यतो टाळा बायफोकलला मी सांगितले काही डिसएडवांटेज आहेत खास करून मानेच्या पोझिशनचे जर तुम्हाला तसा त्रास होत असेल तर बेटर टू गो फॉर प्रोग्रेसिव्ह स्पेक्स या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच या चश्म्यांविषयी माहिती दिलेली आहे आणि याला कसं अडॅप्ट व्हावं याविषयी सुद्धा मी माहिती दिली आहे हा व्हिडिओ जरूर तुम्हाला उपयोगी पडेलच आणि याचा किती उपयोग झाला ते तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा तसंच तुम्हाला याचा फायदा झाला असेल तर आपल्या जे आपले रिलेटिव्ह आहेत मित्र आहेत ज्यांना हा 40 चा चश्मा लागलाय त्यांनाही जरूर शेअर करा कारण याच्यामुळे त्यांचाही नक्कीच फायदा होईल याशिवाय अजून तुम्हाला काही व्हिडिओज किंवा अजून काही माहिती डोळ्याविषयी हवी असेल तर जरूर आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लिहू शकता आणि अशी आणखी आणखी माहिती आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर तुम्हाला सांगू धन्यवाद

source