मोतीबिंदू (Cataract) शस्त्रक्रिया | EDOF लेन्स: कधी निवडावे? | EDOF Lens Explained |
#मतबद #Cataract #शसतरकरय #EDOF #लनस #कध #नवडव #EDOF #Lens #Explained
या व्हिडिओमध्ये डॉ. सौरभ पटवर्धन EDOF (Extended Depth of Focus) लेन्स कधी वापरावा आणि त्याचे फायदे व तोटे काय आहेत, हे स्पष्टपणे समजावून सांगत आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चष्म्यावर अवलंबून राहण्याची इच्छा नसल्यास, हा लेन्स तुमच्यासाठी उपयुक्त आहे. डॉ. पाटवर्धन सांगतात की EDOF लेन्समुळे दूर व मध्यम अंतरावर चांगली नजर मिळते, जी संगणकावर काम करणे किंवा गाडी चालविण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच, काही वेळा रात्रभर धूसरपणा आणि हलके हेलो इफेक्ट यांसारख्या समस्या येऊ शकतात, हेही ते सांगतात.
कोणत्या रुग्णांसाठी हा लेन्स योग्य आहे, आणि तो तुमच्या जीवनशैलीत कसा सुधार करू शकतो, याबद्दल अधिक जाणून घ्या. जर तुम्ही मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर योग्य लेन्स निवडण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ नक्की पाहा!
ठळक मुद्दे:
EDOF लेन्स कधी वापरावा
EDOF लेन्सचे फायदे आणि तोटे
कोणत्या जीवनशैलीसाठी हा लेन्स योग्य आहे
मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर योग्य लेन्स निवड
In this video, Dr. Sourabh Patwardhan clearly explains when to use the EDOF (Extended Depth of Focus) lens and discusses its advantages and disadvantages. If you want to reduce your dependence on glasses after cataract surgery, this lens may be the right choice for you. Dr. Patwardhan explains how the EDOF lens provides clear vision at both intermediate and long distances, making it ideal for activities like working on a computer or driving. He also talks about some potential downsides, like slight blurring or halo effects at night.
#iol #eyecare #drsourabhpatwardhan #cataracttreatment #eyehealth #nandadeepeyehospital
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
https://wa.me/919028817100?text=Appointment
Email: nandadeepeyehospital@gmail.com
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.
Transcript :-
नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालयाच्या सर्व शाखांचा मी संचालक म्हणून काम करतो आपल्याला मोतीबिंदूचा ऑपरेशन करायचं आता ठरलेला आहे आणि याच्यामध्ये लेन्स विषयीची अधिक माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तुम्हाला ऑलरेडी जे बुकलेट दिलेला असेल त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या लेन्सेस या लिहिलेल्या आहेत त्याच्यामधली तुम्हाला जी डॉक्टरांनी तुमच्या डोळ्याची तशीच तुमची गरजा ओळखून जी लेन्स तुमच्यासाठी सिलेक्ट केलेली आहे त्या चा प्रकार आहे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स याचा वापर अशा लोकांना फायद्याचा असतो ज्यांना थोडसं जवळचा सुद्धा विदाऊट चश्मा दिसावं अशी गरज असते त्याचबरोबर त्यांना रात्रीच्या वेळी थोडं ड्रायव्हिंग सुद्धा लागणार असतं जवळचं दिसण्यासाठी अजून एक लेन्स उपलब्ध असते ट्रायफोकल परंतु ट्रायफोकल लेन्स मध्ये रात्रीच्या वेळी ज्यावेळी लाईट समोरून येतात त्यावेळी त्याभोवती वलय किंवा लाईट हा स्प्रेड होतो त्यामुळे ड्रायव्हिंगला अडचण येऊ शकते ही अडचण एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस मध्ये ही अतिशय कमी असते किंवा बऱ्याचदा होत नाही त्यामुळे अशा रुग्णांना ज्यांना एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स बसवलेले आहे त्यांना रात्री ड्रायव्हिंग सुद्धा ते करू शकतात अर्थात लाईट जो असतो तो थोडासा फुटल्यासारखा वाटू शकतो परंतु इतका त्रास होत नाही की ज्याच्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग करता येणार नाही याचा एक डिसएडवांटेज असा आहे की ट्रायफोकल लेन्स मध्ये आपल्याला जवळच सुद्धा दिसू शकतं अगदी जवळच्या अंतरावरच कारण त्याच्यामध्ये जी ऍडिशन वापरलेली असते ती जास्त असते एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स मध्ये ही ऍडिशन कमी असते त्यामुळे जनरली थोडसं लांब आपण कुठली वस्तू धरली तर ती आधी अधिक सुस्पष्ट दिसू शकते त्यामुळे तुम्हाला जर रात्री ड्रायव्हिंग करण्याची गरज असेल पण त्याच वेळी तुम्हाला थोडसं जवळ दिसावं अशी गरज असेल तर तुम्हाला एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस ही लेन्स अतिशय योग्य आहे पण लक्षात ठेवा ही लेन्स वापरल्यानंतर सुद्धा जवळजवळ 20 ते 30 टक्के लोकांना फार बारीक जवळचं बघण्यासाठी चश्मा लागू शकतो तसेच पाच ते दहा टक्के लोकांना दूर साठी सुद्धा चश्मा लागू शकतो या लेन्स मध्ये टोरिक आणि नॉन टोरिक असे दोन प्रकार असतात तुम्हाला जर बुबळाच्या तुमच्या तपासणी नंतर डॉक्टरांनी टोरिक लेन्सचा सल्ला दिला असेल तर तुम्ही जरूर टोरिक प्रकारचीच लेन्स यामधली सिलेक्ट करा कारण जर टोरिक प्रकारातली लेन्स सिलेक्ट नाही केली तर तुम्हाला नंबर राहण्याची शक्यता ही वाढते धन्यवाद
source