Femto Laser Assisted Cataract Surgery | मोतीबिंदू शस्त्रक्रिया |Ai-Assisted लेसर तंत्रज्ञानाने
#Femto #Laser #Assisted #Cataract #Surgery #मतबद #शसतरकरय #AiAssisted #लसर #ततरजञनन
या व्हिडिओमध्ये डॉ. सौरभ पटवर्धन Femto Ai Laser Assisted Cataract Surgery बद्दल माहिती देतात. या प्रक्रियेत AI – Artificial Intelligence वापर करून लेसर दरम्यान सतत मोजमाप घेतले जाते, ज्यामुळे लेसरची अचूकता वाढते. पारंपारिक पद्धतीत ब्लेड आणि फोर्सेप्सचा वापर करून नैसर्गिक लेन्सवर ओपनिंग तयार केले जाते, तर फेम्टो लेसर पद्धतीमध्ये बुबुळाचा छेद लेसरच्या सहाय्याने घेतला जातो, ज्यामुळे ओपनिंग अधिक अचूक होते. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान कमी इजा होते आणि रुग्णांना जलद पुनर्प्राप्तीचा अनुभव मिळतो; 48 तासांच्या आत डोळ्यात पाणी लावण्याची परवानगी असते. यामुळे रुग्णांना स्पष्ट आणि दीर्घकालीन दृष्टी मिळते. या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ पहा!
In this video, Dr. Sourabh Patwardhan explains Femto AI Laser Assisted Cataract Surgery. This method uses Artificial Intelligence (AI) to continuously measure and adjust the laser, making it more accurate. Unlike traditional methods that use blades and forceps to create openings in the natural lens, the Femto Laser technique uses a laser for precise cuts. This results in less damage during surgery and allows for faster recovery, with patients able to apply water to their eyes within 48 hours after the procedure. This advanced technology helps patients achieve clearer and longer-lasting vision. Watch the video for more information on this modern technique!
#FemtoAILaser #CataractSurgery #Nandadeepeyehospital #AI #EyeHealth #VisionCorrection #AdvancedSurgery #DrSourabhPatwardhan #LaserSurgery #EyeCare #ModernMedicine
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.
Transcript :-
नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात माहिती देणार आहे नवीन जी ऑपरेशनची पद्धती मोतीमेंदू साठी उपलब्ध झालेली आहे ज्याला आम्ही फेमटो लेझर असिस्टेड आणि एआय असिस्टेड कॅट्रॅक्ट सर्जरी म्हणतो त्याविषयी नुकतेच आमच्याकडे झेड नावाचं अद्यावत फेमटो लेझर उपलब्ध झालेला आहे आणि या लेझर चा उपयोग आम्ही मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमध्ये करतो या दरम्यानच आर्टिफिशियल याच्यामध्ये इनबिल्ट असल्यामुळे ज्यावेळी हे लेझर होत असतं त्यावेळी तो मेजरमेंट कंटिन्यूअसली घेत लेझर मध्ये बदल करतो आणि ज्यामुळे या लेझरची ऍक्युरेसी अधिक वाढवतो ज्यावेळी आम्ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया कन्व्हेंशनल फेको पद्धतीने करतो जी सुद्धा एक अत्यंत अद्यवत अशी मेथड आहे त्यामध्ये आम्ही ब्लेडच्या साह्याने इन्सिजन तयार करतो आणि एका विशिष्ट फोर्सेप्स च्या साह्याने कॅप्सूल मध्ये म्हणजे लेन्सच्या समोर आम्ही एक ओपनिंग तयार करतो आणि त्यानंतर मोतीबिंदू फेको पद्धतीने काढतो या फेमटो लेझर पद्धतीमध्ये आम्ही बुबुळाचा जो छेद आहे तो सुद्धा लेझरच्या साह्याने अधिक ऍक्युरेट पद्धतीने घेतो लेन्सच्या वरचं जे ओपनिंग आहे ते अतिशय सर्क्युलर म्हणजे अगदी सेंट्रल आणि सर्क्युलर असं लेझरच्या साह्याने केले जाते याचा फायदा असा असतो की लॉंग टर्म मध्ये आपण जी लेन्स डोळ्यामध्ये बसवतो त्याची स्टेबिलिटी आणि सेंट्रेशन हे इम्प्रूव होत असतं याशिवाय या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया चालू करायच्या आधीच या लेझरच्या सहाय्याने मोतबिंदूच्या आतल्या भागाचे छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन किंवा डिव्हिजन केलं जातं आणि ज्यामुळे फेको पद्धती करणाऱ्यालाही सोपी जाते यामुळे बुबळ्याला होणारा कुठलाही दोष किंवा डोळ्यामध्ये युज होणारी एनर्जी ही मिनिमाइज होते आणि त्यामुळे लॉंग टर्म सेफ्टी पेशंटच्या डोळ्याची वाढते या ऑपरेशन नंतर हे जे डोळ्याचे छेद लेझरच्या साह्याने घेतले असल्यामुळे त्याची हिलिंग प्रोसेस सुद्धा फास्ट होते आणि अवघ्या 48 तासानंतरच रुग्णाला अगदी डोळ्याला किंवा चेहऱ्याला पाणी लावण्यात लावायला सुद्धा हरकत नसते इतकी फास्ट याची हिलिंग प्रोसेस असते रुग्णाला येणारी दृष्टी सुद्धा सुस्पष्ट असते आणि या लेझरमुळे जी ऍक्युरेसी असते त्याच्यामुळे डोळ्याला जी दृष्टी चांगली तर राहतेच पण ती लॉंग टर्म सुद्धा चांगली राहू शकते त्यामुळे जरूर तुम्हाला जर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची असेल तर समुपदेशकाला तुम्ही एआय असिस्टेड फेमटो लेझर असिस्टेड सर्जरी विषयी माहिती विचारा धन्यवाद
source