Is Close TV Watching Dangerous for Your Eyes? | जवळून टीव्ही पाहणे डोळ्यांना धोकादायक?
#Close #Watching #Dangerous #Eyes #जवळन #टवह #पहण #डळयन #धकदयक
टीव्ही जवळून पाहिल्याने खरोखरच डोळ्यांना हानी होते का? या व्हिडिओत, डॉ. सौरभ पटवर्धन या सामान्य गोष्टींची सत्यता जाणून घेतात . ते डोळ्यांच्या ताणाबद्दल आणि दृश्य आरोग्याच्या सायन्समध्ये डोकावतात, मिथक स्पष्ट करतात, आणि स्क्रीन वापरण्याच्या सुरक्षित पद्धतीसाठी उपयोगी टिप्स देतात.
डोळ्यांच्या आरोग्यावर खरोखर काय परिणाम होतो आणि टीव्ही किंवा स्क्रीन सुरक्षितपणे कसे पाहावे याबद्दल सल्ला मिळवा. व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि आपल्या दृश्याचे संरक्षण प्रभावीपणे कसे करावे हे शोधा!
डोळ्यांच्या तज्ञ देखभाल आणि वैयक्तिक सल्ल्यासाठी, नंददीप आय हॉस्पिटलला भेट द्या.
Have you heard that watching TV from a close distance can damage your eyes? In this video, Dr. Sourabh Patwardhan explores whether this is a fact or just a common myth. He delves into the science behind eye strain and vision health, clarifies misconceptions, and offers practical advice for safe screen use.
Learn what really impacts your eye health and get tips on how to watch TV or use screens without causing harm to your eyes. Tune in to find out the truth and ensure you’re protecting your vision effectively!
For expert eye care and personalized advice, visit Nandadeep Eye Hospital.
#EyeHealth #MythVsFact #DrSourabhPatwardhan #TVWatching #EyeCareTips #NandadeepEyeHospital #VisionProtection
Transcript :-
बऱ्याचदा तुमचे पालक किंवा ज्येष्ठ मंडळी तुम्हाला सांगत असतील की टीव्हीच्या खूप तुम्ही जवळ बसताय यामुळे तुमचे डोळे खराब होतील हे खरं आहे का तर खरं सांगायचं तर टीव्ही फार जवळून बघितल्यामुळे डोळ्याला काही परमनंट डॅमेज होत नाही कारण डोळे जे टीव्हीच्या स्क्रीन्स असतात त्या डोळ्यासाठी फार हानिकारक नसतात परंतु जर तुम्हाला टीव्हीच्या जवळ जाऊनच बघावं लागत असेल तर तुम्हाला चश्म्याचा नंबर आलेला असू शकतो त्यामुळे जर तुमच्या घरातली लहान मुलं खूप पुढे येऊन टीव्ही बघतात असं तुम्हाला वाटलं तर हा त्यांना डोळ्याला काहीतरी दोष असण्याचे एक लक्षण असू शकतं पण त्याचबरोबर काही ज्येष्ठ व्यक्तींना ज्यांना ऍक्च्युली थोडं कमी दिसत असतं त्यांना थोडासा जवळ टीव्हीच्या जवळ जाऊन बघायला पण काहीच हरकत नाही अर्थात ज्यावेळी तुम्हाला टीव्ही बघायचा असेल त्यावेळी तुम्हाला कम्फर्टेबल डिस्टन्स असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे खास करून खूप अंधारात तुम्ही टीव्ही बघणं टाळा यामुळे डोळ्याला अधिक ताण येऊ शकते धन्यवाद
source