Nandadeep Netralay

जागतिक काचबिंदू (Glaucoma )दिनानिमित्त सुप्रसिद्ध काचबिंदू तज्ञ डॉ. स्नेहा शिंदे यांचे मार्गदर्शन



जागतिक काचबिंदू (Glaucoma )दिनानिमित्त सुप्रसिद्ध काचबिंदू तज्ञ डॉ. स्नेहा शिंदे यांचे मार्गदर्शन

#जगतक #कचबद #Glaucoma #दननमतत #सपरसदध #कचबद #तजञ #ड #सनह #शद #यच #मरगदरशन

“नंदादीप नेत्रालयाच्या” वतीने जागतिक काचबिंदू(ग्लाकोमा )दिनानिमित्त सुप्रसिद्ध काचबिंदू तज्ञ डॉ. स्नेहा शिंदे यांचे मार्गदर्शन

देशात 12 कोटी लोकांना काचबिंदू आजाराची समस्या आहे त्यातील नऊ कोटी लोकांना कायमचे अंधत्व आले आहे. काचबिंदू या नावाप्रमाणेच हा आजार आहे जसा काचेला एकदा तडा गेला की ती काच पुन्हा पूर्वीप्रमाणे होत नाही तसे काचबिंदू झाल्यानंतर आहे ती दृष्टी टिकून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. काचबिंदू हा आजार सहजासहजी लक्षात न येणारा असा आजार आहे यामध्ये सुरुवातीला अवतीभवतीची नजर कमी होत जाते व ज्यावेळी फक्त मध्यभागाची नजर शिल्लक राहते त्यावेळी रुग्णाच्या लक्षात येते असे होऊ नये म्हणून वरचेवर डोळ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे.
काचबिंदूमध्ये एकदा चालू झालेली औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात त्यामुळे ही वेळ टाळण्याकरता आधीच काळजी घेणे आवश्यक आहे.
* काचबिंदू कोणाला होऊ शकतो *
तो अनुवंशिक असू शकतो ,डोळ्यांना मार किंवा इजा झाल्याने होऊ शकतो ,मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेला विलंब झाल्यामुळे होऊ शकतो , ना ईलाजास्तव एखाद्या औषधाचे सेवन बऱ्याच कालावधीकरता केल्याने होऊ शकतो, जन्मताच सुद्धा असू शकतो.
या आजारामध्ये डोळ्यांवरील दबाव प्रेशर वाढते त्यामुळे वरीलपैकी एक जरी धोक्याचा घटक सतावत असेल तर आपण काचबिंदूची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
आपल्याला काचबिंदू झालेला असल्यास आपल्या सर्व रक्ताच्या नातेवाईकांना (सर्व वयाच्या) कल्पना द्यावी व त्यांना काचबिंदूची तपासणी करून घेणे सांगावे कारण काचबिंदू हा अनुवंशिक रोग आहे
सदर परिसंवादास डॉक्टर स्नेहा शिंदे (काचबिंदू तज्ञ) यांनी उपस्थित रुग्ण व नातेवाईक यांना मार्गदर्शन केले
या परिसंवादास नंदादीप नेत्रालयाचे डॉ.प्रसन्न आराध्ये ,डॉ.नम्रता पाटील ,डॉ.ऋचा पाटील व नंदादीप नेत्रालयाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता
.#drsourabhpatwardhan #eyes #glaucomaawareness #glaucomatreatment #glaucomasurgery #ग्लाकोमा
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group ofsuper-speciality eye care hospitals founded in 1980with centres in Sangli, Kolhapur, Belagavi and Ratnagiriwith all advanced ophthalmic specialties availableunder one roof.

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000

For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
Email: nandadeepeyehospital@gmail.com

✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER: The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date, all information contained on it is provided ‘as is’.Nandadeep Eye Hospital may at any time and at its sole discretion change or replace the information available on this channel.

Transcript :-

जागतिक कासबिंदू दिनानिमित्त नंदादीप नेत्रालयाच्या वतीने मोफत मार्गदर्शन पर परिसंवाद झाला त्यातून काचबिंदू आजाराची लक्षणं उपचार आणि गांभीर्य याबद्दलची माहिती देण्यात आली देशात बारा कोटी लोकांना काचबिंदू आजाराची समस्या आहे त्यातील नऊ कोटी लोकांना कायमचा अंधत्व आलय जसा काचेला एकदा तडा गेला की ती कास पुन्हा पूर्वीप्रमाणे होत नाही तसंच काचबिंदू झाल्यानंतर आहे ती दृष्टी टिकून ठेवणं अत्यंत गरजेचे असतं काचबिंदू या आजाराबद्दल कोल्हापुरातील नंदादीप रुग्णालयाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आलं डॉक्टर स्नेहा शिंदे यांनी काचबिंदू आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली हा आजार सहजासहजी लक्षात न येणार आहे सुरुवातीला अवतीभोवतीची नजर कमी होत जाते आणि ज्यावेळी फक्त मध्यभागाची नजर शिल्लक राहते त्यावेळी आजार झाल्याचं लक्षात येतं त्यामुळे वरचेवर डोळ्यांची तपासणी करावी असं आवाहन डॉक्टर शिंदे यांनी केलं हा आजार अनुवंशिक असू शकतो तसंच डोळ्यांना मार किंवा इजा झाल्याने होऊ शकतो तसंच एखाद्या औषधाचे सेवन बऱ्याच कालावधीसाठी केल्यानेही होऊ शकतो शिवाय काचबिंदू जन्मतः सुद्धा असू शकतो असंही डॉक्टर शिंदे यांनी नमूद केलं यावेळी नंदादीप नेत्रालयाचे डॉक्टर प्रसन्न आराध्य डॉक्टर नम्रता पाटील डॉक्टर रुचा पाटील यांच्यासह रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते

source