Latest News

नंदादीप आय हॉस्पिटलला राष्ट्रीय मानांकन

news-National ranking of Nandadeep Eye Hospital

बेळगाव : नेत्र चिकित्सा क्षेत्रात गेली ४३ वर्षे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नंदादीप आय हॉस्पिटलला राष्ट्रीय मानांकन मंडळाने ‘एन-बीएच’ मानांकन दिले आहे. सदर हॉस्पिटल महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे कार्यरत आहे. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सोयी, सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट उपचार पद्धत या सर्व सुविधा एकाच छत्राखाली येथे उपलब्ध आहेत. डॉ. सौरभ पटवर्धन हे या हॉस्पिटलचे संचालक आहेत. या मानांकनांबद्दल त्यांचे व कार्यकारी संचालक डॉ. ज्योस्ना पाटील अन्य डॉक्टर व हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.