Latest News

सांगली : येथील नंदादीप ऑप्टोमेट्री कॉलेजचे विद्यार्थी आरोग्य विद्यापीठात प्रथम आले.

सांगली : येथील नंदादीप ऑप्टोमेट्री कॉलेजचे विद्यार्थी आरोग्य विद्यापीठात प्रथम आले.
नंदादीप ऑप्टोमेट्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य विद्यापीठात यश
सांगली : प्रथम वर्ष बी.एस्सी. ऑप्टोमेट्री परीक्षेत महाराष्ट्र राज्य सरकारी आरोग्य विद्यापीठमध्ये नंदादीप स्कूल ऑफ ऑप्टोमेट्रीच्या शूल उके, श्रुतिका दळवी आणि यशोदा इंगळे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला. या विद्यार्थ्यांना नंदादीपचे वरिष्ठ ऑप्टोम सायन मुखर्जी यांचे मार्गदर्शन मिळाले. नंदादीप नेत्र रुग्णालयाचा वारसा कायम ठेवण्यास सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आम्हाला खरोखर अभिमान आहे. यामुळे सांगली शहराचे नाव देशपातळीवर झळकले, या शब्दात नंदादीप नेत्रालयचे मेडिकल संचालक डॉ. सौरभ पटवर्धन यांनी कौतुक केले. नंदादीप स्कूल ऑफ ऑप्टोमेट्रीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.